Alphabets in different colours starting from A - Z

साक्षरता

5 वर्षांखालील मुलांचा शब्दसंग्रह वाढत राहतो आणि त्यात अनेक प्रकारचे शब्द आणि ध्वनी समाविष्ट होत असतात. या वयात मुले अजूनही जड आवाजावर प्रभुत्व मिळवत असतात, आणि तरीही ते काय म्हणत आहेत हे आपल्याला समजू शकते. अशावेळी ते तीन शब्दांची वाक्ये बनवायला शिकतात.या वयात संभाषण कौशल्य देखील विकसित होत असते. साक्षरता अभ्यासक्रमाच्या मुख्य घटकांमध्ये लिहिण्याचा परिचय आणि सराव हवा. वाचण्याआधी किंवा मुलाने कागदावर शब्द लिहिण्यापूर्वी, लेखनाचे घटक किंवा पद्धत समजून घेतले पाहिजे (पेन्सिल नियंत्रण, अक्षरे तयार करणे, शब्दलेखन). तसेच ध्वनी शिकवण्यासाठी ध्वनीशास्त्र उपयोग करून आवाज आणि ध्वनी याची जोड शिकवली पाहिजे. मुलांना ज्या विषयात आवड निर्माण होते त्या क्रिया ते खूप वेळ करू शकतात.स्कल्प्ट ने (शिल्प) मुलांना कथासंग्रह ऐकण्यास आणि बोलण्याचा आनंद घेण्यासाठी साधने उपलब्ध करून दिली आहेत. वाचण्यास आणि त्यातील अर्थ समजून घेण्यास मदत करते. मुलांना त्यांच्या स्वत: च्या वेगाने आणि आकलनानुसार शिकण्यास वाचन आणि लिखाण शिकू द्या. यासाठी कविता, अक्षर ओळख, अक्षर आणि ध्वनी ओळख याचा उपयोग केला आहे.

जर विद्यार्थ्याने आधीच पूर्व - मूल्यांकन चाचणी घेतली असेल, तर अभ्यास आणि सराव करण्यासाठी क्लिक करा. लिंक.            Click Here

पूर्वमूल्यांकन का?

पूर्व-मूल्यांकन, संबंधित क्षमता शिकण्यापूर्वी मुलाची ताकद, ज्ञान आणि कौशल्ये मोजते. हे शिक्षक किंवा पालकांना मुलाची आवड आणि वैयक्तिक शिक्षण शैली समजून घेण्यास देखील मदत करते.

Go To Assessment
Numbers in different colours starting from 1 2 3 4 5 6 7 8 9 0

गणिती कौशल्ये

शाळा सुरू करण्यापूर्वी, बहुतेक मुले रोजच्या संवादातून बेरीज आणि वजाबाकीची ओळख विकसित करतात.
अश्या रोजच्या सहज घडणार्या गोष्टीतून मुलांना गणिताची ओळख होते आणि याचा उपयोग शाळेत गणित शिकताना होतो.
5 वर्षांपेक्षा कमी वयाची मुले वस्तूंचा आकार ओळखू शकतात. रंग, आकार किंवा उपयोग नुसार गोष्टींची वर्गवारी करू शकतील. उंची, आकार याची तुलना करू शकतील आणि किमान 10 पर्यंत आकडे मोजू शकतील. ‘
गणिती कौशल्ये ही अनेक कौशल्यांच्या पैकी फक्त एक भाग आहे ज्याचा विकास मुलामध्ये लहान वयात सुरु होतो, त्याचबरोबर त्यात भाषा कौशल्ये, शारीरिक आणि सामाजिक कौशल्ये समाविष्ट आहेत. यातील प्रत्येक कौशल्य क्षेत्र इतरांवर अवलंबून आहे आणि इतरांवर प्रभाव टाकते. स्कल्प्ट (शिल्प) या शिक्षण मोड्यूल्सद्वारे एकमेकांचा संबंध जोडून आणते.

जर विद्यार्थ्याने आधीच पूर्व - मूल्यांकन चाचणी घेतली असेल, तर अभ्यास आणि सराव करण्यासाठी क्लिक करा. लिंक.

Click Here

पूर्वमूल्यांकन का?

पूर्व-मूल्यांकन, संबंधित क्षमता शिकण्यापूर्वी मुलाची ताकद, ज्ञान आणि कौशल्ये मोजते. हे शिक्षक किंवा पालकांना मुलाची आवड आणि वैयक्तिक शिक्षण शैली समजून घेण्यास देखील मदत करते.

Go To Assessment
The image of a cloud,which as a globe, a rocket,a bulb, 2 girls dressed like a scientist and a boy in a lab testing with the name Science written on it

विज्ञान

5 वर्षे व त्यापेक्षा कमी वयाची मुले खूप खूप निरीक्षण करतात. ते आजूबाजूचे प्रौढ जे काही करतात त्यांचे निरीक्षण करतात आणि त्यांचे अनुकरण करतात. ही सर्वात महत्वाची मूलभूत विज्ञान कौशल्ये आहेत जी शिकणे आणि विकसित करणे आवश्यक आहे. त्यांच्या निरीक्षणाच्या आधारे ते अनुमान काढू लागतात, अर्थ लावायला शिकतात. गणित ही विज्ञानाची भाषा आहे आणि मोजमाप हे एक कौशल्य आहे जे मुलाने विज्ञानात शिकले पाहिजे. 5 वर्ष आणि त्यापेक्षा कमी वयाची मुले केवळ निसर्गाचे अनुभव घेऊन वैज्ञानिक शोधांचा आनंद घेतात. विज्ञानाला वर्गाबाहेरसुद्धा उत्तम शिकवले जाते, म्हणजेच, फिरायला जा किंवा मुलांना इकडे तिकडे पळू द्या आणि त्यांना काय आवडते ते शोधा. उदाहरणार्थ, मुलांना बियाणे द्या जेणेकरून ते रोपे लावू शकतील आणि गोष्टी कशा वाढतात याबद्दल शिकतील. स्कल्प्ट (शिल्प) ने मॉड्यूल्समध्ये आत्म-अन्वेषणाचे घटक आणले आहेत जे मुलांना त्यांच्या स्वत: च्या वेगाने आणि आकलनानुसार शिकण्यास मदत करतात.

जर विद्यार्थ्याने आधीच पूर्व - मूल्यांकन चाचणी घेतली असेल, तर अभ्यास आणि सराव करण्यासाठी क्लिक करा. लिंक.           Click Here

पूर्वमूल्यांकन का?

पूर्व-मूल्यांकन, संबंधित क्षमता शिकण्यापूर्वी मुलाची ताकद, ज्ञान आणि कौशल्ये मोजते. हे शिक्षक किंवा पालकांना मुलाची आवड आणि वैयक्तिक शिक्षण शैली समजून घेण्यास देखील मदत करते.

Go To Assessment
The images show a family picture, with Grandfather,Grandmother,Father,Mother a son and 2 daughters

आपल्या सभोवतालचे जीवन

हा स्कल्प्ट उपक्रम मुलांना विविधता, इतिहास, भूगोल आणि पर्यावरणशास्त्र समजण्यास, तसेच सामुदायिक भूमिकांचे महत्त्व समजून घेण्यासाठी आणि कार्यक्षम आणि विचारपूर्वक निर्णय घेण्यास मदत करण्यावर लक्ष केंद्रित करतात. 5 वर्षे आणि त्यापेक्षा कमी वयात विविध कौशल्यांचा विकास करण्यासाठी, मुलांच्या स्वतःच्या समाजाच्या आणि कुटुंबाच्या इतिहासाबद्दल शिकणे, महत्वाच्या ऐतिहासिक व्यक्तींबद्दल शिकणे महत्वाचे असते. या संकल्पनांची समज अधिक खोल करण्यासाठी स्कल्प्ट वाचन, लेखन आणि कला यांचा उपयोग. सामाजिक अभ्यास (नागरिकशास्त्र, इतिहास आणि भूगोल म्हणून) मुलांना मानवी नातेसंबंध आणि समाज कसे कार्य करते हे समजून घेण्यास मदत करते.

जर विद्यार्थ्याने आधीच पूर्व - मूल्यांकन चाचणी घेतली असेल, तर अभ्यास आणि सराव करण्यासाठी क्लिक करा. लिंक. .       Click Here

पूर्वमूल्यांकन का?

पूर्व-मूल्यांकन, संबंधित क्षमता शिकण्यापूर्वी मुलाची ताकद, ज्ञान आणि कौशल्ये मोजते. हे शिक्षक किंवा पालकांना मुलाची आवड आणि वैयक्तिक शिक्षण शैली समजून घेण्यास देखील मदत करते.

Go To Assessment
The images indicates about children sitting together having a social and emotional feeling towards each other

सामाजिक आणि भावनिक

वयाच्या 5 व्या वर्षापर्यंत, बहुतेक मुलांना भीती, सहानुभूती, मत्सर, ओशाळपणा, अपराधीपणा आणि लाज यासारख्या भावना जाणवू लागतात. याचवेळी ते आणखी एक मोठी भावना म्हणजे 'निराशा' याचा पण अनुभव घेत असतात. त्यांना हवं ते मिळत नाही तेंव्हा ते निराश होतात आणि रडतात, ओरडतात किंवा फेकाफेक करतात.
स्कल्प्ट (शिल्प) स्वयं-नियमन, सहानुभूती, सामायिकरण, वाटून घेणे, या गोष्टींची ओळख करून देते. तसेच प्रौढ आणि समवयस्कांशी सकारात्मक संबंध जोडणे अश्या संकल्पनाची ओळख करून देते, जेणेकरून मुलाला सामाजिक वातावरणात वावरण्याची समज विकसित होईल.